"नमो शेतकरी महासन्मान निधी योजने"अंतर्गत वर्षाला मिळणार ₹6000;परंतु या 3 बाबींची पूर्तता आवश्यक..
महाराष्ट्र सरकारची "नमो शेतकरी महासन्मान निधी' योजना"धर्तीवर सुरू होणार आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना दर चार महिन्यांतून एकदा 2000 रुपये, असे वर्षात तीन हप्त्यांत 6000 रुपये मिळणार आहेत. मे अखेरीस राज्याचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
केंद्र सरकारनुसार राज्याच्या योजनांचे निकष आहेत आणि ते आयकरदाते, सरकारी नोकदार आणि लोकप्रतिनिधींना लाभ प्राप्त होईल. १ फेब्रुवारी २०१९ पूर्वीच्या ज्यांना शेतजमीन असेल त्यांनी पीएम किसान सन्मान निधीच्या दोन हजार रुपयाच्या हप्त्याचा लाभ मिळविण्यासाठी आधार नंबर आणि मोबाइल नंबर आपल्या बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे.
टीप:( ज्या खात्यात पीएम किसान योजनेचे पैसे येतात )
राज्यातील लाखों शेतकरी आजही आधार नंबर आणि मोबाइल नंबर बँक खात्याशी जोडलेले नाहीत. अशा शेतकर्यांनी प्रत्यक्ष त्वरित आधार नंबर आणि फोन नंबर बँक खात्याशी लिंक करून 'नमो शेतकरी महासन्मान निधी' योजनेचे पैसे मिळवावे, वर्तमानातील वेळेत न केल्यास त्यांना राज्य सरकारच्या योजनेचे पैसे मिळण्यार नाहीत.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मिळतात 5000 रु,कसे ते जाणून घ्या...
'नमो शेतकरी महासन्मान निधी' योजनेसाठी या बाबी बंधनकारक, तरच मिळेल लाभ
• १ फेब्रुवारी २०१९ पूर्वीचा जमीनधारक शेतकरीच पात्र
• सन्मान निधी मिळवण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना ई-केवायसी करावी लागेल
• लाभार्थीने त्याच्या नावावरील मालमत्ता नोंदीची माहिती द्यावी
• बॅंक खात्याला आधार लिंक करून घेणे बंधनकारक
१६६० कोटी वर्षाला लागतील
राज्य सरकारने केंद्राकडूनही राज्यातील शेतकरी लाभार्थींची माहिती मागविली आहे. केंद्र सरकारचा चौदावा हप्ता व महाराष्ट्र सरकारचा पहिला हप्ता आता मेअखेरीस किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांना मिळणार आहे. राज्यात जवळपास ८३ लाख लाभार्थी आहेत. वार्षिक एक हजार ६६० कोटींची तरतूद करावी लागणार आहे.