हाॅलिवूडमध्ये केला जात आहे AI चा निषेध
आॅनलाईन कंटेंन्ट स्ट्रिमिंग प्लॅटफाॅर्म नेटफ्लिक्सने नुकतेच नोकरीकरता व्हॅकन्सी असल्याचे सांगितले आहे. नेटफ्लिक्सला आता एका AI Product Manager ची गरज आहे. AI संदर्भात एकीकडे हाॅलीवूडमधून मोठा विरोध केला जात आहे आणि नेमक्या अशाच वेळी NETFLIX ने या व्हॅकन्सी विषयी सांगितले आहे. हॉलिवूडच्या रायटर्स असोसिएशन आणि इतर संस्था मनोरंजन उद्योगातील अनेक लोक AI आणि त्याच्या सतत वाढत असणाऱ्या निर्भतेवर नाराज आहेत.
AI Product Manager नोकरी नेमकी कशी असेल
कंपनी AI Product Manager पदाकरता तब्बल 9 लाख डाॅलर पगार देऊ शकते. म्हणजेच भारतीय रूपयांत सांगायचे झाले तर 7.4 कोटी रुपये एआय प्रोडक्ट मॅनेजरचे काम नेटफ्लिक्सच्या मशीन लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये सुधारणा करणे आणि सामग्री तयार करण्यासाठी एआयचा वापर करणे हे असेल.
या पदाकरता मिळणार मोठा पगार
कंपनीला AI Product Manager व्यतिरिक्त AI संबधित इतर अनेक जागा रिक्त आहेत, ज्याकरता माणसांची गरज आहे. नुकतेच कंपनीने Technical Director ची जागा भरली आहे. .या पदाकरता कंपनी 4.5 ते 6.5 लाख डाॅलर पगार देत आहे. म्हणजेच जवळपास कंपनी एका वर्षात 3.70 कोटी ते 5.35 कोटी रूपये Technical Director देत आहे.
भारतात देखील आता AI चा वापर केला जात आहे
देश आणि जगातील अनेक बड्या कंपन्‍या आता आपल्‍या विविध कामाकरता आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा अधिकाधिक वापर करत आहेत. मायक्रोसॉफ्ट आणि ओपनएआयच्या चॅटजीपीटी आणि गुगलच्या बार्डने जगाला अक्षर: चकित केले आहे. भारताविषयीच बोलायचे झाले तर अनेक मीडिया हाऊसने एआय अँकरची ओळख देखील करून दिली आहे
नुकतेच पत्रकारिता क्षेत्रात प्रथमच एका AI अँकरने एका मंत्र्याची मुलाखत घेतली आहे. Channeliam.com या डिजिटल न्यूज पोर्टलने भारतातील पहिली AI न्यूज अँकर 'प्रगती' हिची देशाला ओळख करुन दिली. प्रगती या AI न्यूज अँकरने केरळचे सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटन मंत्री, पी. ए. मुहम्मद रियास यांची अभूतपूर्व मुलाखत घेतली.
इतर महत्वाच्या बातम्या
<a href="https://ift.tt/mLt9Pj1 Blast: पाकिस्तान हादरलं! जमियत उलेमाच्या रॅलीत बॉम्बस्फोट; 20 ठार, 50 जखमी
Neflix Job : नेटफ्लिक्सला 'या' कामाकरता आहे लोकांची गरज वर्षभरात मिळेल साडे सात कोटींचा पगार
जुलै ३१, २०२३
0
Tags