Jio Cheap 5g Smartphone : रिलायन्स जिओने काही दिवसांपूर्वीच परवडणाऱ्या दरात लॅपटॉप लाँच केला होता. यानंतर आता कंपनी सर्वात स्वस्त 5G मोबाईल लाँच करण्याच्या तयारीत आहे. या फोनबाबत कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत घोषणा होऊ शकते. रिलायन्सची 46वी वार्षिक सर्वसाधारण सभा 28 ऑगस्टला आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये कंपनीचे चेअरमन भविष्यात येणाऱ्या JioPhone 5G सोबत इतर मोठ्या घोषणा करू शकतात.

Jio Phone 5G ची अपेक्षित किंमत

Jio Phone 5G ची सुरुवातीची किंमत 8,000 ते 10,000 रुपये असू शकते. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाले तर हा स्मार्टफोन (Smartphone) या वर्षाच्या शेवटी विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतो.

Jio Phone 5G ची अपेक्षित वैशिष्ट्ये

फीचर्स (Features) आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाले तर, <a style="color: #e03e2d;" href="https://ift.tt/iKYPbAt Phone 5G मध्ये 6.5-इंचाचा IPS LCD HD+ डिस्प्ले (Display) दिला जाईल. ज्याचे रिझोल्यूशन (Resolution) 1600 x 720 पिक्सेल आणि 60 Hz चा रिफ्रेश रेट (Refresh Rate) असेल. फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले असेल. या आगामी फोनमध्ये 4GB/6GB रॅम आणि 32GB इनबिल्ट स्टोरेज दिले जाऊ शकते, जे मायक्रोएसडी कार्डने वाढवता येते. स्नॅपड्रॅगन 480+ हा प्रोसेसर (Processor) जिओच्या या फोनमध्ये असू शकतो.

या फोनच्या कॅमेरा सेटअपमध्ये मागील बाजूस 13 मेगापिक्सलचा पहिला कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा दुसरा मॅक्रो कॅमेरा उपलब्ध असेल. त्याच वेळी, समोर 8-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा दिला जाईल. तर आगामी फोन 5,000mAh बॅटरीने सुसज्ज असेल जो 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. सोबतच फोनचे इतर फिचर देखील दमदार असणार आहेत, ज्यामध्ये 5G कनेक्टिव्हिटी (Connectivity), साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, मायक्रोएसडी कार्ड स्लॉट आणि ड्युअल सिम. जिओचा नवीन फोन ऑक्टा कोअर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 480 चिपसेटने सुसज्ज असेल.

जिओच्या 5G मोबाईलबद्दल सध्या अगदी कमी माहिती समोर आली आहे. हा एक अल्ट्रा-अफॉर्डेबल (Altra-Affordable) मोबाईल असेल असं सांगण्यात येत आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार याची किंमत 8 ते 10 हजार असेल असं म्हटलं आहे. मात्र, काही ठिकाणी हा त्याहून स्वस्त मोबाईल असू शकतो असं सांगण्यात येत आहे. जिओ (Jio) कंपनीने अद्याप या फोनबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केली नाहीये.

इतर महत्वाच्या बातम्या

<a style="color: #e03e2d;" href="https://ift.tt/PmhwGXK Indian CFO : भारतीय वंशाचे वैभव तनेजा टेस्लाच्या CFO पदी, एलॉन मस्क यांचा मोठा निर्णय

Jio Affordable 5G Smartphone : जिओ आणणार सर्वात स्वस्त 5G मोबाईल! जाणून घ्या काय आहेत भन्नाट फिचर्स आणि किंमत
ऑगस्ट ०९, २०२३
0
Tags